एकता हीच संघटनेची शक्ती : दिगंबर मुनी विशेष सागरजी

by : Ajay Gayakwad

वाशिम / मालेगाव : – अमर्याद पुण्योदय झाल्यावरच संताचे शहरात आगमन होते. संत ज्या शहरात येतात त्या शहरात सोन्याचे सोने होते.  ज्या नगरीतून त्यांचा विहार होतो तेथील वातावरण उदासीन होऊन जाते. खरे तर मालेगावातील सर्व जनतेचे अहो भाग्य आहे की वेळोवेळी त्यांना मुनिश्रींचा सहवास लाभत आहे.वरील विधान परमपूज्य श्रमण मुनी विशेष सागर जी यांनी मालेगांव पद्मप्रभू दिगंबर जैन मंदिरात धर्मसभेला संबोधित करताना केले. पूज्य मुनी श्री पुढे म्हणाले की,संघटनेच्या एकात्मतेत ताकद आहे, आज प्रत्येक समाजात आणि कुटुंबात अशा व्यक्तीची गरज आहे जी कैची सारखं काम करत नाही तर सुई सारखं जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही तर जोडण्याचं बोलते ज्या घरात भावाभावात प्रेम असते ते घर स्वर्गासमान असते.ज्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीत भांडणे होतात ते घर नरकासारखे असते.ज्या घरात मोठ्यांचा मान सन्मान असतो,संतांचे चरण घरात पडतात,तेथे लक्ष्मी वास करते. तुम्ही भाग्यवान आहात की या कलीयुगातही संतांचा तुम्हाला सहवास लाभत आहे.कुशल व्यापारी पैशातून पैसा कमावतो, त्याचप्रमाणे सद्गुणी आत्मा पुण्यातून पुण्य कमावतो.

पूज्य मुनी श्रींचा मंगल विहार जामनेर (खान्देश) येथून हिंगणघाट जिल्हा वर्धाकडे होत आहे तेथे पूज्य मुनी श्रींच्या मार्गदर्शनाखाली 200 वर्षे प्राचीन जैन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले असून 12 फेब्रुवारी रोजी वेदीचा शिलान्यास व 13 फेब्रुवारी रोजी पूज्य मुनी श्रींचा 17 वा मुनी दीक्षा दिन आहे.

#munivisheshsagarji #malegaonwashim

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *