



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर:-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 27 डिसेंबर 2022 ला भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आनंदराव अडबाले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले की, *मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे*. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन कोरपना जिवती तालुका आरोग्य अधिकारी *डॉ.स्वप्निल टेंभे* यांनी केले. त्यांनीही आपल्या उद्घाटन पर भाषणातून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच व्यसनापासून दूर राहावे आणि स्वच्छता ठेवावी तरच आम्हाला कोरोना सारख्या व्हायरस पासून दूर राहता येईल असे आव्हान केले. कार्यक्रमाला *संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे, महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे *डॉक्टर कौशल्या अडवाणी स्त्रीरोग तज्ञ चंद्रपूर* डॉक्टर अक्षय चव्हाण नेत्रतज्ञ, डॉक्टर सुरज यशवंत सोळंके टाटा केअर सेंटर चंद्रपूर, डॉक्टर वैदेही लोखंडे दंतचिकित्सक, डॉक्टर भूषण मोरे, डॉक्टर नंदिनी मोरे, डॉक्टर पंकज देरकर, गडचांदूर. पर्यवेक्षक गाडगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. अपर्णा चालूरकर, समीक्षा आत्राम, सयुजा वनकर ,सोयाम सिस्टर, पूजा सिस्टर, कमलेश , निकीता सिस्टर ,सारिका सिस्टर, इत्यादी उपस्थित राहून मदत केली. सदर आरोग्य शिबिरामध्ये 200 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात सहकार्य केले.तसेच त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली, या आरोग्य शिबिराचा गडचांदूर परिसरातील अनेक रुग्णांनी लाभ घेतला. तसेच विद्यालयातील, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे तर आभार दिनकर झाडे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य शिबिराच्या संयोजिका भुवनेश्वरी गोपमवार धर्मपुरीवार यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच ग्रामीण रुग्णालय चे अधीक्षक डॉक्टर संजय गाठे,डॉक्टर श्रीनिवास सोनटक्के, डॉक्टर प्रदीप ठाकरे,विजयराव डाहुले यांचेही योगदान लाभले. याप्रसंगी किन्नाके सर व गोपमवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून खरी कमाई हा उपक्रम राबविला. मेहेरकुरे सर , कु. सोज्वल ताकसांडे मॅडम , खैरे सर ,सातारकर सर, मुप्पीडवार सर, डफाडे सर ,सय्यद सर, गुजर सर ,बावनकर सर, मांढरे सर, जी. एन.बोबडे सर, मरसकोल्हे सर,आत्राम सर, मेश्राम सर, श्रीमती सुषमा शेंडे, शशिकांत चन्ने, सिताराम पिंपळसेंडे, संकल्प भसारकर, प्रीतेश मत्ते , वाढई, आदोळे यांचे सह विद्यालयातील सर्व उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.