भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० संपादित ग्रंथांचे प्रकाशन व संपादकांचा गौरव*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबर २०२१ ते १० डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ४० ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप काळे यांच्या संकल्पनेतून तथा आधार प्रकाशन, अमरावती चे संचालक प्रा. विराग गावंडे यांच्या सहकार्याने प्रस्तुत अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
सर्व ग्रंथाचे प्रकाशन नुकत्याच संपन्न झालेल्या “भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे : दशा व दिशा” या विषयावरील आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत डॉ. शाम कोरेटी, डॉ. सुहासिनी बाजपेयी, प्राचार्य डॉ. संजय धनवटे, प्रभारी प्राचार्य डॉ. अर्चना डाहाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रा. विराग गावंडे, डॉ. अनंत रिंढे व डॉ. संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतातील सर्वच घटक राज्यातील एक हजार पेक्षा जास्त शोध लेख ४० ग्रंथांच्या माध्यमातून विविध प्रासंगिक दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. संपूर्ण भारतात अशा प्रकारे संपादित ग्रंथांचे प्रकाशन एवढ्या मोठ्या संख्येने आणि अतिशय कमी कालावधीत कधीच झालेले आढळत नाही; त्यामुळे हा एक रेकॉर्ड समजला जात आहे. विशेषतः डॉ. संदीप काळे व प्रा. विराग गावंडे यांनी मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, वनस्पतीशास्त्र अशा विविध विषयाच्या प्राध्यापकांना एकत्रित सोबत घेऊन या उपक्रमास यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
प्रस्तुत संपादित ग्रंथांमध्ये डॉ. संदीप काळे यांनी संपादित केलेल्या स्वतंत्र एकूण १५ ग्रंथांचा समावेश आहे. या ग्रंथामध्ये विविध विषयांवरील अर्थात गांधीवादी विचार (सात ग्रंथ), मानवी हक्क (सहा ग्रंथ), पर्यावरण (दोन ग्रंथ), सुशासन (दोन ग्रंथ), समकालीन भारतीय लोकशाही (चार ग्रंथ), संशोधन पद्धती (दोन ग्रंथ), स्त्रीवाद (पाच ग्रंथ), आधुनिक भारतीय विचार (दोन ग्रंथ), ग्रामीण विकास व पंचायत राज (तीन ग्रंथ), शाश्वत विकास (एक ग्रंथ) , आम्ही भारतीय नागरिक (दोन ग्रंथ), भारत@७५ (दोन ग्रंथ), आधुनिक विदर्भाच्या महिला शिल्पकार (एक ग्रंथ) इत्यादी अतिशय बहुमूल्य ग्रंथांचा समावेश आहे. पुढील चार महिन्यांत समकालीन सामाजिक व राजकीय चळवळी, लिंगभाव समानता, पंचायत राज, प्रसार माध्यमे या विषयावरील एकूण दहा संपादित ग्रंथ प्रकाशन प्रक्रियेत आहेत.
आधार प्रकाशन द्वारा संपादित ग्रंथनिर्मिती मध्ये संपादक म्हणून प्राचार्य डॉ. संजय धनवटे (वर्धा), डॉ. अर्चना डाहाणे, डॉ अनंत रिंढे (सेलू), डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. राम सवनेकर (वर्धा), डॉ. प्रतिभा जाधव (नाशिक), डॉ. संजय पाटील (जळगाव), डॉ. मुक्ता सोमवंशी (परभणी), डॉ. प्रतिभा टावरी (खामगाव), डॉ. प्रकाश यादव (पुणे), डॉ. स्वाती येवतकर, डॉ. प्रकाश तळे (समुद्रपूर), डॉ. विजय गावंडे (दिग्रस), डॉ. रंजना शृंगारपुरे (भंडारा), डॉ. संजय गोरे, डॉ. माया मसराम (गडचांदूर) डॉ. बाळासाहेब जोगदंड, डॉ. दिपाली घोगरे, डॉ. संदीप डोंगरे (अकोला) डॉ. भारती देशमुख (वाशीम), नितीन गौरखेडे (रोहणा), डॉ. अरविंद सोमनाथे (हिंगणघाट) यांना निमंत्रित करण्यात आले होते. *या सर्व संपादकांचा आधार प्रकाशन अमरावती द्वारा सन्मानचिन्ह व रोपटे भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी सर्व संपादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.*
प्रस्तुत परिषदेत डॉ. अनंत रिंढे यांच्या पीएच. डी. च्या प्रबंधावर आधारित “पंडित जवाहरलाल नेहरु व लढा स्वातंत्र्याचा” या संदर्भग्रंथांचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादित ग्रंथांचे प्रकशित करताना मान्यवर तसेच संपादक म्हणून प्राचार्य डॉ. संजय धनवटे यांचा सन्मान करताना डॉ. शाम कोरेटी

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *