सुधीरभाऊंच्‍या भेटीने पांडूरंग भेटीचा आनंद – प्रा. दैवत बोरकर* *♦️प्रा. दैवत बोरकर यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला सत्‍कार.* *♦️दैवत बोरकर यांनी शोधप्रबंधाच्‍या माध्‍यमातुन व्‍यक्‍त केलेली सद्भावना लाख मोलाची – सुधीर मुनगंटीवार*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

ज्‍येष्‍ठ नेते, कार्यक्षम, कार्यतत्‍पर लोकप्रतिनिधी, विकासपुरूष अशी अनेक विशेषणे ज्‍यांच्‍या कर्तृत्‍वासमोर थिटी पडावीत असे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आज झालेली भेट माझ्यासाठी संस्‍मरणीय ठरली. सुधीरभाऊंनी माझे केलेले स्‍वागत माझ्यासारख्‍या सामान्‍य प्राध्‍यापकाला बहुमान देवून गेले. सुधीरभाऊंची सहृदयता, संवेदनशीलता, त्‍यांचे उत्‍तुंग कार्य या सर्व बाबींचा उहापोह माझ्या शोध प्रबंधात मी जरी केला असला तरी आज मला प्रत्‍यक्ष पांडूरंग भेटीचा आनंद झाल्‍याची प्रतिक्रिया महात्‍मा ज्‍योतीबा फुले कनिष्‍ठ महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथील प्राध्‍यापक दैवत बोरकर यांनी व्‍यक्‍त केली.

२५ डिसेंबर रोजी प्रा. दैवत बोरकर यांनी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रा. दैवत बोरकर यांचा शाल, श्रीफळ आणि तिरंगा ध्‍वज भेट देत सत्‍कार केला व आचार्य पदवी प्राप्‍त केल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी म्‍हणून मी केलेल्‍या कार्याचा गौरव शोधप्रबंधाच्‍या माध्‍यमातुन करत माझ्याविषयी जी सद्भावना प्रा. दैवत बोरकर यांनी व्‍यक्‍त केली ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली व दैवत बोरकर यांना त्‍यांच्‍या पुढील कार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

महात्‍मा ज्‍योतीबा फुले कनिष्‍ठ महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथील प्राध्‍यापक दैवत बोरकर यांनी ‘‘सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय नेतृत्‍व’’ – एक चिकित्‍सक अध्‍ययन (१९९५ – २०१५) या विषयावर आचार्य पदवीसाठी सादर केलेल्‍या शोधप्रबंधाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्‍या माध्‍यमातुन मान्‍यता प्रदान करत पीएचडी घोषीत करण्‍यात आली आहे. पीएचडी घोषीत झाल्‍यानंतर प्रा. दैवत बोरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *