कळंबुसरे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न.

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कलंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ, आदर्श प्रियदर्शनी महिला मंडळ प्रणित आदर्श नवरात्रोत्सव मंडळ यांच्या विद्यमाने नुकताच नवरात्रोत्सव दरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून 83 नागरिकांनी आपली तपासणी करून उपचार करून घेतला आहे.या कामी महात्मा गांधी मिशन एमजीएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल कामोठे यांचे सहकार्य लाभले आहे.

उरण तालुक्यातील कळंबुसरे येथे दरवर्षी प्रमाणे आदर्श ग्रामोधार मंडळ तसेच आदर्श प्रियदर्शनीय महिला मंडळ प्रणित आदर्श नवरात्रोत्सव मंडळ यांच्या सौजन्याने नवरात्रोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या उत्सव दरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम राबविले जात आहेत.

नुकताच या मंडळातर्फे कलंबूसरे प्राथमिक शाळेत आरोग्य शिबीर महात्मा गांधी मिशन एमजीएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल कामोठे यांच्या सहकार्याने एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या मार्फत राबवून मोफत तपासणी आणि विविध आजारांवर मोफत औषधे वाटप करण्यात आली. या शिबिरात गावातील एकूण 83 नागरिकांनी लाभ घेतला. तसेच या शिबिरात मोफत आयुषमान कार्डचे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी जे के ठाकूर, योगेश साळुंखे यांनी मोलाचे योगदान दिले, तसेच डॉ.ओझा साळुंखे,डॉ.शिखा पांडे,डॉ. सारेक अहमद,डॉ.निहारका सबनीस,डॉ.गीता गायत्री मेहता,डॉ.प्रवीण कुमार,डॉ.विवेक काळे तसेच त्यांचे सहकारी ज्योती जगताप त्याचबरोबर आरोग्य मित्र सुषमा पाटील तसेच वाहन चालक किशोर यांनी आपली सेवा दिली.या कामी मंडळाच्या सदस्यांनी अधिक मेहनत घेतली.
त्याचबरोबर मंडळाकडून रायगड जिल्हा परिषद कळंबुसरे येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनि चित्रकला स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या . प्रथम क्रमांक शौर्य महेंद्र पाटील,द्वितीय क्रमांक धैर्य जितेंद्र पाटील तसेच तृतीय क्रमांक स्वरा मंगेश नाईक या विद्यार्थीना बक्षिसे वाटप करण्यात आली.श्रद्धा संस्कार आनंद यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आदर्श असे सामाजिक स्तुत्य उपक्रम राबवून मंडळाकडून आदर्श ठेवण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *