भाजपा घुग्घुसतर्फे जश्ने ईद-ए-मिलादून्नबी निमित्त लाडू वाटप

 

लोकदर्शन 👉शिवजी सेलोकर

घुग्घुस शहरात ईद-ए-मिलादुन्नबी अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. या सनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेतील सहभागी मुस्लिम समाज बांधवांना भाजपा घुग्घुसतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात लाडू वाटप करून शुभकामना देण्यात आल्या.
घुग्घूस शहरात मध्यभागी असणाऱ्या गांधी चौकात मागील अनेक वर्षापासून ईद निमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी कडून घेण्यात येतो. या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक आघाडीतील सर्व पदाधिकारी व शहरातील मुस्लिम समाजातील सर्व मान्यवर सहभागी होतात. यावर्षी सुद्धा ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करून साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, हसन शेख, संजय तिवारी, संतोष नुने, सिनु इसारप, चिन्नाजी नलभोगा, हनीफ शेख, मुज्जू लोहानी, असगर खान, खलील अहमद, अनवर खान, मुमताज कुरेशी, नईम खान, मुस्तकीन खान, वसीम खान, सय्यद मुस्तफा, असलम कुरेशी, सय्यद अली, मोसीन शेख, इम्तियाज रज्जाक, रज्जाक शेख, परवेज शेख, गुड्डू शेख, फारुख शेख, सोहेल शेख, बबलू सातपुते, साजन गोहने, संजय भोंगळे, मधुकर धांडे, हेमंत कुमार, हेमंत पाझारे, प्रवीण सोदारी, सुरेंद्र जोगी, सतीश कामतवार, मंगेश परचाके, सुनंदा लिहितकर, सुनिता पाटील, सुनील ब्रह्मे, महेश मुक्के, महेश बांदूरकर, मुकेश कामतवार, मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *