जागर करूया माता भवानीचा

 

लोकदर्शन 👉सौ भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे

जागर करूया/ माता भवानीचा/
उत्सव देवीचा /आनंदाने//….१

लग्न शंकराशी/ हिमालयपुत्री/
नाव शैलीपुत्री/पुजतात//….२

करी तपश्चर्या/ वाजवून टाळ /
हाती जप माळ /कमंडलू//…..३

शिरोमणी घंटा /आकार चंद्राचा/
प्रतीक शांतीचा /चंद्रघंटा//…..४

अष्टभुजा रूप /नैवेद्य कोहळा/
साजरा सोहळा/ उष्मांडेचा//….५

चौभूजा स्वरूप /कमळ आसन/
सुंदर दिसन/स्कंदमाता//…..६

कत नाव ऋषी /कात्यक गोत्रात/
जागर रात्रीत /कात्यायनी//…..७

भयानक रूप/ तण तिचे काळे/
उग्र तीचे डोळे /काल रात्री//…..८

आभूषणे वस्र/ वर्ण गोरा पान/
ऋषभ वाहन /महागौरी//…..९

सर्व सिद्धी देवी /करू उपासना/
त्या मनोकामना/ सिद्धी दात्री//…..१०

सौ भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here