नवरात्री विशेष : उरणच्या नवशक्ती बुधवार २८ सप्टेंबर प्रस्तुत उरण मधील नवशक्ति । लेखक । अजय शिवकर । *आजच्या देवीचे तिसरे रूप* *चन्द्रघंटा*

 

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते.या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात.चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते.चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते.देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते.

जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन,आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.

आज पाहू या उरणच्या तिसऱ्या शक्तीची माहिती

*करंजाची द्रोणागिरी माता*

इ.स.११ व्या शतकाच्या दरम्यान उरण वसण्यापूर्वी येथे खूप जंगल होते. आता सात पाडे असणाऱ्या करंजाला तुरळक दोन तीन घरे असावीत. एकदा एक गुराखी वरचा राईचा भाग पार करून डोंगराच्या पार गुरे चरायला गेला असता त्याला पाषाण रुपी मूर्ती सापडली. तीन तेकड्या पार त्याने करून हलकेच मूर्ती आणली. पण राईच्याभागात येताच जड झाली. त्याने तिथेच ती ठेऊन खाली जाऊन काही लोकांना घेऊन आला. पण मूर्ती जागेवरून हलली नाही.

मग तिथेच देवीची स्थापना करण्यात आली. असे म्हणतात, हनुमान लक्ष्मणासाठी संजिवनी घेऊन जाताना हातातुन काही तुकडे पडले. त्या पर्वतांपैकी हा डोंगर म्हणजे द्रोणागिरी पर्यत. किल्ल्याचही नाव त्याचवरून ठेवले असावं. द्रोणागिरी पर्वत व किल्ल्यावरून देवीचे नाव आई द्रोणागिरी माता.

उद्या गुरूवार
२९/०९/२०२०२
उद्याच्या देवीचे चौथे रूप — कुष्मांडी
उद्याच्या उरणच्या शक्तीची माहिती — पिरवाडीची मांगीनीदेवी माता

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *