धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेची मा.आमदार श्री गोपिचंद पडळकर यांचेशी विविध मुद्द्यांवर चर्चा*

 

लोकदर्शन👉मोहन.भारती

*धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य व नागपूर जिल्ह्याच्या वतीने संयुक्त भेट माननीय आमदार गोपीचंद पडळकर सोबत दुपारी 2.30 वाजता वनविभागाच्या रेस्ट हाऊस सेमिनरी हिल येथे घेण्यात आली. सर्वप्रथम त्यांचा सन्मानचिन्ह व संघटनेची स्मरणिका देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांनी आमदार पडळकर साहेब यांचेशी समाज बांधव कर्मचारी चे विविध प्रश्नांवर मोबाईल वर चर्चा केली व सविस्तर माहिती संघटनेचे पदाधिकारी देतील असे सांगितले. संघटनेने केलेल्या कामाचा आढावा महासचिव शरद उरकुडे यांनी सविस्तरपणे त्यांना समजून सांगितला. संघटनेचे राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभासद असून पाच ते दहा हजाराच्या वर समाज बांधव कर्मचारी संघटनेच्या संपर्कात आहे. संघटना अनेक विषयावर काम करते ज्याप्रमाणे अधीसंख्य कर्मचारी च्या समस्या, पदोन्नतीतील विषय, नॉन क्रिमिनल मध्ये वाढ आवश्यक आहे, तसेच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाडे समाजाचा धनगर जमातीशी कुठलाही संबंध नसताना धनगर समाजाच्या सवलती लाटण्याचा प्रयत्न करत आहे याची सुद्धा जाणीव करून दिली अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष विलासराव डाखोळे यांनी अधिसंख्य या विषयावर विशेष भर देत अधिसंख्य झाल्यानंतर कर्मचाऱ्यांवर उद्भवणाऱ्या समस्या यावर चर्चा केली तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त पेन्शन लवकरात लवकर सुरू करावी व त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ तात्काळ मिळावे याकरिता आपण पुढाकार घ्यावा संघटना आपल्या सोबत सदैव राहील याची ग्वाही दिली. नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री. यशवंत कातरे यांनी जुनी पेन्शन या विषयासंदर्भात चर्चा करू पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, निवृत्तीनंतर तो त्याला मिळालाच पाहिजे. परंतु 2005 नंतर जे कर्मचारी सेवेत आहेत त्यांना पेन्शन पासून दूर ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. राजस्थान, झारखंड, छत्तीसगड या राज्याने नवीन पेन्शन रद्द करून पूर्वीप्रमाणे पेन्शन योजना लागू केली आहे अशाच प्रकारे एन पी एस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यावर सविस्तर चर्चा केली.*
*त्यानंतर अधिसंख्य प्रश्नावर संविधान चौकामध्ये ऑफ्ररो संघटनेमार्फत आज पासून सुरू झालेल्या आमरण उपोषणास भेट देऊन धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा आपल्या उपोषणास पाठिंबा आहे असे घोषित करण्यात आले. त्याच करिता आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना धनगर अधिकारी कर्मचारी संघटनाच्या मार्फत सविधान चौकामध्ये आणण्यात आले उपोषणकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यांनी मार्गदर्शन करत असताना सरकार आपल्या पाठीशी सदैव राहील असे आश्वासन दिले लवकरात लवकर मुंबईत गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून आपला विषय लवकरात लवकर मार्ग कसा लागेल याकरिता प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. यावेळेस संघटनेचे राज्य पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष विलासराव डाखोळे, महासचिव शरद उरकुडे, राज्य कोषाध्यक्ष उज्वल रोकडे, राज्य पदाधिकारी दिवाकर कोठे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत कातरे, जिल्हा सचिव किशोर चिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अरविंद लोही, अशोकराव माहुरे, घनश्याम ढोले, वैशाली कातरे, विजय निघोट, नेहा निघोट, किशोर शेळके, अभिमान शेटे, कैलास उरकुडे, एधनेश्वर ढवळे, इतर पदाधिकारी उपस्थित होते.*

*शाम ढोले*
*राज्य प्रसिद्धी प्रमुख,*
*धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *