चांदुस विद्यालय येथे २५ विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप-विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार -युवकमित्र परीवार संस्थेचा ‘सायकल बँक’उपक्रम-

लोकदर्शन👉 राहुल खरात

– चांदुस येथील राजे शिवछत्रपती विद्यालय येथे ठाकरवाडी,वडगाव पाटोळे कोरेगाव खुर्द या गावातून पायी चालत शाळेत येणाऱ्या 25 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार संस्थेच्या ‘सायकल बँक’ उपक्रमाअंतर्गत मोफत सायकल वितरित करण्यात आल्या.प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार झोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परीवार संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन,वर्क फॉर इक्वेलिटी संस्थेचे व्यवस्थापक गणेश सूर्यवंशी,सूरज कांबळे,चांदुस गावचे सरपंच,उपसरपंच,शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ,शिक्षकवृंदासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व लाल फित कापून सायकल बँकेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक श्री.कुमार झोरे यांनी विद्यार्थ्यांना भारताचा एक जबाबदार नागरिक होऊन वंचितांच्या सेवेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.सायकल बँकचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी सायकल बँक उपक्रमाचे महत्त पटवून देत सत्यशोधक समाज व स्थापना याबद्दल माहिती दिली.प्रास्ताविक मुख्यध्यापक चंद्रकांत आरुडे यांनी केले तर आभार गणेश सूर्यवंशी यांनी मानले.

——— पुणे शहरातील जुन्या सायकली दुरुस्त करून गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना मदत—–

सायकल बँक उपक्रमाअंतर्गत पुणे शहरात जुन्या सायकली संकलन करण्याची मोहीम राबवली जात आहे.नागरीकाकडे किंवा सोसायटीमध्ये पडून असलेल्या जुन्या सायकली संकलित करून दुरुस्त केल्या जातात.व ग्रामीण भागात गावापासून लांब असलेल्या शाळामध्ये पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वितरित केल्या जातात.एक हजार सायकली संकलित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी प्रवीण महाजन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here