युवा सेनेच्या जिल्हा चिटणीस पदी ॲड. मुनिनाथ कारमपुरी यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सत्कार.

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
*●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●*
*सोलापूर दिनांक :- २५/०९/२०२२ :-* शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब, युवा सेना नेते मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार ॲड. मुनिनाथ कारमपुरी यांची सोलापूर जिल्हा चिटणीस पदी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून निवड जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांना शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण तालुका व अक्कलकोट मतदार संघ या चार मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज), विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास चिलवेरी, प्रशांत जक्का, नागनाथ कारमपुरी, शिवा ढोकळे, कालिदास काळपगार, गणेश म्हंता, महिला विडी कामगार शोभाताई पोला, यल्लमा पेंटा, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी, कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- युवा सेनेच्या जिल्हा चिटणीस पदी ॲड. मुनिनाथ कारमपुरी यांचे निवड झाल्याबद्दल त्यांचा कामगार सेनेचे वतीने सत्कार करतांना विष्णू कारमपुरी (महाराज), श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर आणि विडी कामगार बंधू – भगिनी मोठ्या संख्येने दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here