कन्हाळगाव अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन करण्यास जनतेचा विरोध* *जनसुनावणीच्या माध्यमातून समस्या निकाली काढावी* *आमदार सुभाष धोटे यांच्या प्रशासनाला सूचना*

लोकदर्शन👉 मोहन भारती

गोंडपिपरी :-
गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाडगाव अभयारण्याचे संवेदनशील क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन जनसुनावणी करिता कन्हाडगाव येथे आमदार सुभाष धोटे यांचे प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभाग चंद्रपूर चे एकुण १८०२.०६५ हेक्टर व वनविकास महामंडळाचे २५१३८.१४६ हेक्टर असे एकंदरीत २६९४०.२११ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. या कन्हाळगाव वनक्षेत्राला जनतेचा विरोध असताना सुद्धा वन प्रशासनांनी २०२०-२१ मध्ये अभयारण्याची मान्यता प्रस्थापित केली. आता वन प्रशासन कन्हाडगाव अभयारण्याला संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) मान्यता प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे. परंतु यापूर्वी सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोनला जनतेचा आधीपासूनच विरोध होता आणि या संदर्भात झालेल्या सभेत सुद्धा उपस्थितानी ईको सेन्सिटिव्ह झोनचा विरोध केला आहे.
कन्हारगाव अभयारण्यातील संवेदनशील क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये बाधित होत असलेल्या ५७ गावांपैकी राजुरा मतदार संघातील ४४ गावे येत असून इको सेन्सिटिव्ह झोन अनुषंगाने होत असलेल्या जन सुनावणीत मान्यता देत असताना ज्वलंत समस्या निर्माण होऊन झोन मध्ये येत असलेल्या गावकऱ्यांचे हक्क बाधित होणार नाहीत या दृष्टिकोनातून निर्णय घेऊन समस्या निकाली काढावी अशा सूचना राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
वन विभागांनी शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या वन्य प्राण्यांपासून होत असलेल्या नुकसानीवर उपाय योजना म्हणून शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आणली. योजनेअंतर्गत मंजूर होत असलेल्या निधीचा रास्त उपयोग व्हावा, आवश्यकतेनुसार खर्च केला जावा या दृष्टिकोनातून अभयारण्यलगत गावा गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्या गठित करण्यात आल्या. परंतु वरिष्ठांनी समित्यांचे कुठलेही प्रस्ताव न मागता स्वमर्जीने श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन निधीचा विल्हेवाट लावत असल्याबाबत सभेमध्ये वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून बोलल्या गेले. सोबतच इको सेन्सिटिव्ह झोन हे गावातील सर्वसामान्य नागरिकांना समजण्याइतपत नाही. इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असलेले क्षेत्र दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाला बाधित करणारे आहे. काही गावचे क्षेत्र जंगलालगत असल्याने एक किलोमीटर अंतराचा मुद्दा सुद्धा झोन मध्ये बाधित गावाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. त्यामुळे इको सेन्सिटिव्ह झोनची जन सुनावणी प्रलंबित ठेवावी अशी मागणी कन्हारगाव सभेतील उपस्थितीत वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व जनतेकडून करण्यात आली.
या प्रसंगी चंद्रपूर वणवृत्तचे मुख्य वनसंरक्षक, श्री लोणकर साहेब, मध्य चांदा उपवनसंरक्षक, श्वेता बोड्डू , उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल,
वनपरिक्षेत्राधिकारी धाबा, कोठारी व पोंभूर्णा, तुकाराम झाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस गोंडपिपरी, अशोक रेचनकर अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती सकमूर, देविदास सातपुते सरपंच पोडसा, साईनाथ कोडापे उपसरपंच लाठी,नामदेव सांगळे माजी सरपंच धाबा, बालाजी चणकापुरे उपसरपंच दरुर, अनिल कोरडे,आनंदराव कोडापे चेक नांदगाव,अनुराग फुलझले किरमीरी, यासह गावागावातील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, वनसमिती सदस्य, पोलीस पाटील, विभागाचे पदाधिकारी व कन्हारगाव अभयारण्य परिसरातील गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *