ग्रा. प. सार्वत्रिक निवडणुकांचे नामनिर्देशन ऑफलाईन पद्धतिने स्विकारावे. आमदार सुभाष धोटे यांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडे मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र भरावयाची अखेरची तारीख दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. राजुरा मतदार संघात जिवती २९ कोरपना- २५ व राजुरा ३० ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक होणार असून तिन्ही तालुके डोंगराळ, अतिदुर्गम, नक्षल प्रभावित असल्याने अनेकदा नेटर्वक अभावी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी बँकेची व इतर कार्यालयीन कामे एक एक आठवडा पडलेली असतात त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीस सदस्य व थेट सरपंच पदाकरीता संगणक प्रणाली दवारे ऑनलाईन नामनिर्देशन पत्र वेळेत सादर करणे शक्य होणार नाही. यामुळे निवडणुक लढविणारे ईच्छुक उमेद्वार निवडणुकीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अतिदुर्गम भागातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे नामनिर्देशन पत्र आँफलाईन पद्धतीने स्वीकारावे अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांना केल्या आहेत.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील ग्रामपंचयात सर्वत्रीक निवडणुका सन २०२२ या कालावाधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आनलाईन नामनिर्देशन सुरू आहेत. या प्रणालीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आँफलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *