विठ्ठलनगर जि.प. शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

आज दिनांक 24 सप्टेंबर,2022 रोजी आटपाडी येथील विठ्ठल नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष, विष्णू तम्मा जाधव व मुख्याध्यापिका, सौ. सुजाता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित पालकांच्यामधून सर्वानुमते अध्यक्ष म्हणून श्री प्रशांत भाऊसाहेब पाटील यांची, उपाध्यक्ष म्हणून सौ. आरती बिरदेव गावंदरे यांची तर सचिव म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका, सौ. सुजाता जाधव यांची निवड करण्यात आली. समितीचे सदस्य म्हणून विष्णू तम्मा जाधव, कैलास उद्धव पिसे, संजय संभाजी कुंभार, वैशाली रावसाहेब बनसोडे, अनुराधा विवेकानंद पिसे, प्रा. नागेश मसू चंदनशिवे, राजेंद्र फुल्याप्पा जाधव यांची निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीनंतर समितीचे माजी अध्यक्ष विष्णू जाधव यांनी नूतन अध्यक्ष प्रशांत पाटील यांचा पुस्तक देऊन सत्कार केला, तर शाळेच्या मुख्याध्यापिका, सुजाता जाधव यांनी उपाध्यक्ष, आरती गावंढरे यांना पुस्तक भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व सदस्यांना ही शाळेच्या वतीने प्रत्येकी एक पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. कळेल मॅडम व सौ. मंडले मॅडम यांनी शाळेच्या विविध शालेय समस्या पलकांच्यासमोर मांडल्या, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. नागेश चंदनशिवे, समितीचे अध्यक्ष, मा. प्रशांत पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सदरच्या शिक्षक-पालक सभेस प्रविना शेख, अरिफा मुलाणी, महेशकुमार खरात, विष्णू जाधव, परशुराम जाधव, प्रशांत पाटील, विठ्ठल शिल्पी, राजेंद्र जाधव, डॉ. रामदास नाईकनवरे, कैलास पिसे, सोमनाथ चव्हाण, संजय कुंभार, विजय कुंभार, प्रा. नागेश चंदनशिवे, विजया नवले, बेबिजान मुलाणी, वैशाली बनसोडे, सुनिता धायगुडे व भारती गवांदरे इत्यादी पालक व त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष, प्रशांत पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here