माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून धुतुम गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 24 सप्टेंबर रायगड जिल्ह्यात शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम जोरात सुरु असून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कार्यसम्राट माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये विकास कामे असो किंवा मतदारसंघातील नागरीकांना सामाजिक, शैक्षणिक मदतीचा हात असो त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या याच कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून धुतुम गावातील बाळाराम अनंत ठाकूर, हेमंत मधुकर ठाकूर आणि संतोष हरी ठाकूर यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी सोबत जासई उपविभागप्रमुख राजन कडू , शिवसेनेचे ग्रा. सदस्य रविनाथ ठाकूर, शिवसेनेचे ग्रा. सदस्या पूजा ठाकूर, शाखा प्रमुख कुंदन पाटील, उपशाखा प्रमुख बंधन ठाकूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here