एक गाव एक साथ बाप्पा विसर्जन या उपक्रमाला भाविकांचा उदंड प्रतिसाद

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 9.सप्टेंबर वशेणी गावातील गणपती बाप्पांचे विसर्जन एकसंघ, शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात व्हावे म्हणून ग्रामपंचायत वशेणी आणि ग्रामस्थ मंडळ वशेणी यांच्या सौजन्याने सरपंच जीवन गावंड यांनी सुरू केलेल्या एक गाव एक साथ बाप्पा विसर्जन या उपक्रमाला गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिला.

या अगोदर वशेणी गावात गणरायाचे विसर्जन एकसंघ पणाणे होत नव्हते. ज्याचा तो गणपती समुद्रावर आणायचा . मग प्रत्येकाची वेगळी आरती असायची.ही आरती चालू असताना अजून काही नवीन गणपती यायचे.मग त्यांची पुन्हा नवीन आरती.या सर्व बाबीचा विचार करून वशेणी ग्रामपंचायतीचे सरपंच जीवन गावंड यांनी एक गाव एकसाथ बाप्पा विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. या वेळेत विसर्जन घाटावर एक सामुदायिक महा आरती करण्यासाठी वशेणी दादर पूल रस्त्यावर विसर्जन घाटावर पथदिव्यांची सोय, लाईट व स्पिकरची व्यवस्था केली होती. तसेच गणरायाच्या मूर्ती विसर्जन घाटाकडे नेताना ईन आणि आऊट असे दोन मार्ग तयार केले होते.वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून पार्किंगझोन तयार केला होता.आणि भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली होती.या उपक्रमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तरूणाईची क्रेझ अर्थात सेल्फी पाॅईंट सुध्दा तयार करण्यात आला होता.या सेल्फीचा आनंद मनमुराद पणे भाविकांनी परिवारासहीत सेल्फी काढून लुटला.

एक गाव एकसाथ बाप्पा विसर्जन ही व्यवस्था दिड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस आणि अनंत चतुर्थीच्या विसर्जना पर्यत केली होती. आज या उपक्रमाची सांगता करण्यात आली. एकंदरीत 500 हून अधिक गणरायांचे विसर्जन
या उपक्रमा अंतर्गत वशेणीच्या समुद्रावर करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, गणपत ठाकूर, कृष्णा ठाकूर,डी.जे.ऑपरेटर संतोष म्हात्रे, अविनाश पाटील, सुनिल ठाकूर,विश्वास म्हात्रे, विलास म्हात्रे, निशिकांत म्हात्रे, समीर म्हात्रे, महेंद्र पाटील , दर्शन म्हात्रे आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने विशेष सहकार्य केले.

या वेळी गणराय विसर्जनाचे धावते समालोचन मच्छिंद्रनाथ म्हात्रे गुरूजी यांनी केले. तर महाआरती घेण्यात अनंत तांडेल,बाबुराव म्हात्रे, विनायक म्हात्रे, हिराजी पाटील,जगन्नाथ म्हात्रे आदिं भक्त गणांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *