विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टिकोनासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज- ,,,,,,,,,,,, मुख्याध्यापक धर्मराज काळे

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन यावा
साठी विज्ञान प्रदर्शनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक संजय गाडगे ,ज्येष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे उपस्थित होते.त्यांनीही विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व सोदाहरण विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे बनविलेल्या प्रतिकृती ठेवल्या होत्या.त्या सर्व विद्यार्थ्यांना पाहता आल्या त्यातून नवशास्त्रज्ञ व चिकित्सक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा हेतू होता.या कार्यक्रमाचे संचालक कु. माधुरी उंमरे यांनी तर कार्यक्रमाचे आभार भुवनेश्वरी गोपमवार यांनी मानले कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक सुरेश पाटील ,भालचंद्र कोंगरे यांचे सह विद्यालयातील संकल्प भसारकर प्रयोगशाळा सहाय्यक तसेच विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here