इन्फंट कान्व्हेंट येथे शिक्षक – पालक संघाची स्थापना.

लोकदर्शन👉मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलची राजुरा येथे शाळेचे शिक्षक आणि पालक यांची सहविचार सभा घेऊन शिक्षक – पालक संघाची स्थापना करण्यात आली. यात शिक्षक – पालक संघाने परस्पर संवाद कायम ठेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करण्याचा संकल्प घेण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजित धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक – पालक संघाचे सीबीएसई शाखेचे अध्यक्ष मुख्याध्याप रफिक अन्सारी, शिक्षक – पालक संघाचे स्टेट शाखेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, पालकवर्गातून उपाध्यक्ष उध्दव राठोड, सिताराम मरापे, सह उपाध्यक्ष सुभाष मरस्कोल्हे, बालकृष्ण पिंगे, सचिव संतोष सागर, श्वेता भटारकर यांनी स्थान भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू यांनी केले, सूत्रसंचालन दिपक खाडे यांनी तर आभार प्रदर्शन श्वेता भटारकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here