जिद्द,चिकाटी, व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते,, ,,,ऍड,दीपक चटप

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा तालुक्यातील रवींद्रनाथ टागोर विद्यालय अहेरी येथे शनिवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय मसे होते. तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक व सत्कारमूर्ती ब्रिटिश सरकार ची चेवणींग 45 लाख शिषयवृत्ती प्राप्त गडचांदुर येथील ॲड.दिपक चटप,कोरपना येथील नायब तहसीलदार पदी निवड झालेले प्रतिक बोरडे, चामोर्शी येथील नुकतेच इटली व स्विझरलँड येथे आदिवासीच्या प्रश्नावर आधारित मांडणी करण्यास जाऊन आलेले ॲड. बोधी रामटेके ,माजी मुख्याध्यापक प्राचार्य संजय ठावरी, मोरे ,प्रदीप बोबडे प्रक्षत्र अधिकारी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही हे होते.यावेळी उपस्थितीतानी विध्यार्याना स्पर्धा परीक्षेतील यशस्वी तेची गणितं व आव्हाने, व करीअर ची विविध शासकीय व निमशासकीय,खाजगी व आवडीचे पदाची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिपलशेंडे यांनी केले तर संचालन पांनघाटे ,व आभार आगलावे यांनी मानले.कार्यक्रमास 300 विद्यार्थि,शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सिडाम , परसुटकर , कुतरमारे मॅडम, अनीलराव चटप, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.सत्कार मूर्तींना सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ विजय मसे यांच्या हस्ते सत्कार केला.याप्रसंगी शालेय परिसरात मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *