आटपाडी तालुका साहित्य मंचतर्फे ८ ऑगस्ट रोजी शुकाचारी येथे शिदोरी साहित्य संमेलन .

 

लोलदर्शन👉 राहुल खरात

आटपाडी तालुका साहित्य मंच या व्हॉट्स ॲप ग्रुपतर्फे ८ ऑगस्ट रोजी शुकाचारी येथे शिदोरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
आटपाडी तालुक्यातील साहित्यिकांचा नुकताच आटपाडी तालुका साहित्य मंच या नावाने व्हॉट्स ॲप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे . या ग्रुपमध्ये जुने व नवीन मिळून एकूण ४० साहित्यिक आहेत .
तालुक्यातील सर्व साहित्यिक एकत्र यावेत , जेष्ठ साहित्यिकांचे नव्याने लिहू लागलेल्या साहित्यिकांना / कवींना मार्गदर्शन व्हावे , लिहित्या हातांना बळ मिळावे, तालुक्याची साहित्य परंपरा अधिकाधिक गतीमान व्हावी , तालुक्यातील गावागावांत साहित्याचे वातावरण निर्माण होऊन लोकांचे मनोरंजन व्हावे , मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, प्रबोधनातून समाज परिवर्तन व्हावे या उद्देशाने आटपाडी तालुका साहित्य मंच निर्माण करण्यात आल्याचे मत जेष्ठ साहित्यीक प्रा . सुनील दबडे यांनी व्यक्त केले आहे .
या मंच मार्फत दोन महिन्यांतून किमान एक साहित्यिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे . याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात शुकाचारी या निसर्गरम्य ठिकाणी ८ ऑगस्ट रोजी शिदोरी साहित्य संमेलन घेऊन होणार आहे .
आटपाडी तालुक्यातील सर्व कवी / साहित्यिक ८ ऑगस्ट रोजी आपापली शिदोरी घेऊन या दिवशी शुकाचारी (शुक्राचार्य देवस्थान ) या ठिकाणी येतील . या दिवशी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत भोजन पार पडेल . दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत कवीसंमेलन गप्पा गोष्टी गाणी इत्यादी साहित्यिक कार्यक्रम संपन्न होईल .
या कार्यक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक डॉ सयाजीराजे मोकाशी, जेष्ठ कवी प्रा . सुभाष कवडे , जेष्ठ साहित्यिक प्रा विश्वनाथ जाधव , पत्रकार सादिक खाटीक, यांच्यासहीत अनेक मान्यवर संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आटपाडी तालुक्यातील सर्व कवी / साहित्यिक यांनी या शिदोरी साहित्य संमेलनासाठी उपस्थित रहावे असे आवाहन साहित्यिक सुनील दबडे , गझलकार सुधीर इनामदार , कथाकथनकार जीवन सावंत , निवेदक आणि कवी प्रा . श्रीकृष्ण पडळकर यांनी केले आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *