आटपाडी खानापूर आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांचा फुले एज्युकेशन तर्फे सन्मान !

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

आटपाडी-डॉ.शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी निमित्ताने ,श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी आटपाडी ,जवळे सभागृहात गेली दोन दिवस 11 ते 12 जुलै 2022 रोजी भव्यदिव्य ग्रंथ दिंडी सह मोठी दर्जेदार साहित्य संमेलन डॉ खरात संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मोठया यशस्वीरीत्या पार पाडले सोबत शासनाची वाट न पहाता डॉ खरात यांच्या स्मारकासाठी स्वतःची 1 एकर जागा देऊन जे दातृत्व दाखविले त्याबद्दल फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे जेष्ठ संपादक abp माझा चॅनेल चे राजीव खांडेकर यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.
यावेळी संमेलन सरचिटणीस मा. विलास खरात,ट्रस्ट चे विश्वस्त डॉ.रवींद्र खरात,झेड पी सदस्य अरुण बालटे,उद्योजक जवळे आप्पा, पंढरीनाथ नागणे,समाजसेवक रवी लांडगे,प्रा.शिंदे सर,महात्मा फुले सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बजरंग फडतरे उपस्थित होते.
याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की डॉ.शंकरराव खरात यांनी बहुजन व उपेक्षित घटकांचे वास्तव जीवन पुस्तकाचे माध्यमातून मांडून त्यांच्या व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले.यामुळे जगाला एक लेखक साहित्याचे माध्यमातून काय करू शकतो हे दाखवून दिले.अशा महान प्रेरणादायी साहित्यिकाचे कार्य भावी पिढ्यानपिढ्याना मिळाले पाहिजे ,त्यांचे सर्व साहित्य नवीन लेखकांना प्रेरणादायक ठरावे म्हणून त्यांचे उचित स्मारक खरे तर शासनाने करणे अपेक्षित होते पण त्यांचे संघर्षमय जीवन राजेंद्र आण्णाने पाहिले म्हणूनच त्यांनी पुढाकार घेऊन स्मारकासाठी स्वतःची एक एकर जागा देऊन पहिले मोठे पाऊल स्वतः पुढे केले सोबत एका मंचावर सर्व राजकारणी आणून त्यांनी एका साहित्यिकाला मोठा सन्मान तर दिला.तसेच भव्यदिव्य ग्रंथ दिंडी काडून एक शिस्तबद्ध रॅली ने सर्व समाज,घटक एकसंघ दाखवीत सर्व कार्यक्रम बहारदार करीत सर्व लेखक ,कवी सामाजिक कार्यकर्ते यांचा योग्य तो सन्मान केला म्हणूनच मला देखील महापुरुषांचे कृतिशील कार्य देशमुख आण्णा पुढे नेत असल्याचा अभिमान वाटला .
या सोहळ्याचे आभार पत्रकार राहुल खरात यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *