मालमत्ता कर न भरल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत तर्फे संबंधित कंपन्यांना जप्तीची नोटीस.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १२ जुलै ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा, ता. उरण, जि. रायगड यांचे पुर्वीचे महसुली गाव शेवा असून शेवा हद्दीतील कंपन्यांनी केलेल्या बांधकामाचा व मोकळया जागेचा मालमत्ता कर वसुलीचा अधिकार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांना आहे. त्यामुळे शेवा हद्दीतील एकून बांधकामापैकी M/S NSICT, NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्यांनी केलेल्या बांधकामावर ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२४ नुसार संबंधीत कंपन्यांना दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी मालमत्ता कराचे बिल व त्यानंतर दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी मागणीची रीट नोटीस बजावून ३० दिवसांची मुदत दिलेली होती.

ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी मालमत्ता कर वसुली संदर्भात केलेल्या कारवाईवर M/S NSICT, – NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्याकडून ग्रामपंचायतीने दिलेल्या मुदतीत संबंधीत कंपन्यांनी मालमत्ता कराची रक्कम ग्रामपंचायतीमध्ये जमा न केल्याने व त्यासंबंधी कोणतेच समाधान कारक उत्तर न दिल्याने ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी मालमत्ता कर वसुली संदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ नुसार दिनांक ०५ जुलै २०२२ रोजी M/S- NSICT, NSIGT, GTI, BPCL, BMCTPL या कंपन्यांवर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस दिलेली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *