माजी सैनिकांच्‍या समस्‍यांच्‍या निवारणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*देशातील अत्‍याधुनिक सैनिक ⭕शाळा उभारण्‍याच्‍या प्रक्रियेत योगदान देवू शकलो याचा मनापासून आनंद.*

*⭕भाजपातर्फे माजी सैनिकांचा सत्‍कार*

सैनिक बांधवांनी आपल्‍या जीवनातील अनमोल क्षण या देशाच्‍या सेवेसाठी, रक्षणासाठी खर्च केले त्‍या सर्वांचे अभिनंदन करताना, सत्‍कार करताना मला मनापासून आनंद होत आहे. सैनिकांच्‍या त्‍यागामुळे, शौर्यामुळे आज आम्‍ही सारे भारतीय सुरक्षीत आहोत. सैनिक शरिराने जरी वृध्‍द झाला तरीही तो शेवटच्‍या क्षणापर्यंत जवान असतो. आपल्‍या सैनिकी शाळेत परमवीर चक्र प्राप्‍त सैनिकांचे प्रेरणादायी पुतळे आहेत. या माजी सैनिकांच्‍या समस्‍या जाणून घेत त्‍यांची सोडवणूक करण्‍यासाठी मी निश्‍चीतपणे प्रयत्‍न करेल तसेच जिल्‍हयातील माजी सैनिकांच्‍या संघटनेला सर्वतोपरि सहकार्य करेन अशी ग्‍वाही विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी सैनिकांचा सत्‍कार सैनिकी शाळा चंद्रपूर येथे आयोजित करण्‍यात आला होता. यावेळी माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, प्राचार्य डेव्‍हीड सन्‍स, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, माजी सैनिक व त्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, माजी पंतप्रधान स्‍व. लालबहाद्दूर शास्‍त्री यांनी जय जवान, जय किसान चा नारा दिला. त्‍यांचे हे शब्‍द त्‍यागाचे, शौर्याचे प्रतीक आहे. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान अशी जोड दिली. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान अशी जोड देत प्रगतीचा नवा आयाम प्रस्‍थापित केला. या देशाची सेवा करण्‍यासाठी उत्‍तम सैनिक तयार व्‍हावे यासाठी या परिसरात देशातील अत्‍याधुनिक सैनिकी शाळा सुरू करण्‍याचे भाग्‍य मला लाभले. या शाळेच्‍या सुधारणेसाठी मी सदैव प्रयत्‍नशील राहील, असेही आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

एका आर्मी प्रमुखाने म्‍हटले होते, ‘’एखादा व्‍यक्‍ती म्‍हणतो मला मृत्‍युचे भय नाही, एक तर तो खोटे बोलतो किव्‍हा तो भारतीय सैनिक आहे’’. अशा शूरवीर सैनिकांची दिव्‍य परंपरा भारतीय संस्‍कृतीला लाभली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षामध्‍ये स्‍वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्‍या शूरवीरांचे स्‍मरण करणे गरजेचे आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *