कायदेविषयक जनजागृती शिबीर

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 28 उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. 27/4/2022 रोजी रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायंन्स अँड कॉमर्स, बोरी -उरण येथे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश क. स्तर उरण तथा विधी सेवा समिती उरणचे अध्यक्ष निलेश एम. वाली उपस्थित होते. व त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उरण तालुका वकील संघटना चे अध्यक्ष अँड. डी. व्ही. नवाळे व उपाध्यक्ष अँड किशोर ठाकूर व अँड पराग म्हात्रे , अँड. धीरज डाकी, अँड. जिवीका डाकी, अँड अर्चना माळी उपस्थित होते. शाळेच्या प्रशासकीय अधिकारी पुष्पा कुरूप यांनी प्रस्तावना केली. संस्थेच्या वतीने विकास महाजन , सेक्रेटरी प्रसन्न कुमार , खजिनदार , शाळेच्या प्राचार्य अक्षता घरत व मुख्याध्यापिका संजिता थळी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे उत्तम पार पडला असुन संस्थेचे अध्यक्ष शेखर.व्दा. म्हात्रे यांनी आयोजकांचे, उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *