गोवठने येथील आई भवानी गावदेवी माते चा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 28 चैत्र कृष्ण 11 मंगळवार दि 26/4/2022 व चैत्र कृष्ण 12 बुधवार दि 27/4/2022 रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मंगळवार दि 26/4/2022 रोजी सकाळी 6 वा अभिषेक व आरती, रात्री 9 वा. जागरण, रात्री 11:45 वा महा आरती, बुधवार दि 27/4/2022 रोजी पहाटे 4 वाजता महा अभिषेक व आरती व पहाटे 5 वाजल्यापासून देवदर्शन असे विविध धार्मिक उपक्रम उत्साहात संपन्न झाले. सरपंच प्रणिता म्हात्रे, माजी उपसरपंच समाधान म्हात्रे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत म्हात्रे, सदस्य -श्रीकांत म्हात्रे,महेंद्र म्हात्रे, ओमकार म्हात्रे, समीर म्हात्रे, शीतल म्हात्रे, रविंद्र म्हात्रे यांनी तसेच मंदिर व्यवस्थापन कमिटी, विश्वस्त देऊळ व मधली आळी, व गोवठने ग्रामस्थांनी विविध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *