पलूस येथील पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन खारकांडे तर सचिवपदी मारुती शिरतोडे यांची निवड


लोकदर्शन 👉 राहुल खरात
*⭕संस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*

आज रविवार दिनांक २४/४/२०२२ रोजी सकाळी दहा वाजता पद्मशीला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सभासदांची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा पलूस येथील सुयश क्लासेस मध्ये उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नितीन खारकांडे होते.प्रारंभी मागील व चालू वर्षातील दिवंगत झालेल्या समाज सुधारक, क्रांतिकारक ,क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामध्ये पलूस चे लोकनेते खाशाबा अण्णा दळवी व थोर स्वातंत्र्य सेनानी सातारा प्रतिसरकारच्या लढयाचे कॅप्टन रामभाऊ लाड कुंडल यांना सभेने आदरांजली वाहिली. यानंतर संस्थेचे सचिव अजित खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सभेपुढील विषय चर्चेला ठेवले. या सभेत विविध विषयावर चर्चा होऊन काही ठराव संमत करण्यात आले.संस्थेचे नूतन संचालक मंडळ याच सभेत सर्वानुमते निवडण्यात आले. संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी मावळते अध्यक्ष नितिन खारकांडे यांची फेरनिवड करण्यात आली तर संस्थेच्या सचिव पदी मारुती शिरतोडे यांची निवड करण्यात आली.सदरच्या सर्वसाधारण सभेत संचालक संभाजी माने, विश्वनाथ निकम ,प्रसाद जोशी, सुनील गुरव, नारायण माळी आदींनी चर्चेत भाग घेतला. सभेनंतर नूतन अध्यक्ष व सचिव यांचा सर्व सभासदांनी सत्कार केला गेला. चहापान व राष्ट्रगीत आनंतर सभेची सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *