श्री मुनिनाथ महाराजांचे नागनाथ कारमपुरी यांच्या हस्ते महाआरती.

* लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- १६/०४/२०२२ :-* श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांचे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त नियमित महाआरती व महापुजन कार्यक्रम नागनाथ कारमपुरी व महिला भाविकांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने पुर्व विभागातील कुचन नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री. मुनिनाथ महाराजांचे पुण्यतिथी महोत्सवास दररोज पहाटे काकड आरती करण्यात आली. त्यापैकी पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री नागनाथ कारमपुरी यांच्या शुभहस्ते करण्यात आलेल्या आरती समारंभास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते. काकडा आरती संपल्यानंतर सामुदायिक रित्या हरिपाठ व पारायणही करण्यात आले. श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवास विविध कार्यक्रम संपूर्ण ७ दिवस अखंड विना सप्ताह संपन्न झाले. या सप्ताहास सामुदायिक महाआरती करण्यात आले.
सदर प्रसंगी यंकम्मा मुत्याल, यमनाबाई पिस्का, सिद्राम पोला, कवसल्या मुसकुर, विष्णु चिलका, कमलाबाई चिलका यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*●========..=====.========
*फोटो मॅटर :- श्री. दिगंबर मुनिनाथ महाराज यांचे महाआरती करतांना नागनाथ कारमपुरी व भाविक भक्तगण दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *