” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उतसाहात साजरी”


लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 मोहन भारती

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेशवर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदिप विद्यालयाचे मुख्याध्यापक पि.पि.क्षीरसागर, बि.व्हि.बुधवंत, जि.एम.कावळे, बळिराम शेंबडे आदी उपस्थित होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक पि.पि.क्षीरसागर, बि.व्हि.बुधवंत, जि.एम.कावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषनाने करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एम.एस.गिरी यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *