बंकटस्वामी विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

लोकदर्शन 👉 राहुल खरात

“भारतीय संविधानाचे आहेत शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
ज्यांच्यामुळे लाखो जणांचा झाला उद्धार,
दीनदुबळ्यांना मिळाला जगण्याचा अधिकार.”

श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट या संस्थेच्या बंकटस्वामी विद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले व मनोभावे दर्शन घेतले याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री उंदरे सर श्री खाकरे सर श्री रिंगणे सर श्री आनेराव सर श्री सुरेश भोसले श्री प्रा.मांजरे सर श्री बाबुराव कानडे श्री कल्याण अनंत्रे बासू दळवी तसेच शाळेतील ठराविक विद्यार्थी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *