सामुहीक प्रयत्नातून शंकरराव खरात यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू .* *राजेंद्रआण्णा देशमुख यांचे उदगार .

लोकदर्शन आटपाडी दि . ९ (प्रतिनिधी ) 👉राहूल खरात

डॉ . शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीचा दोन दिवशीय सांगता सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत करीत सर्वांच्या सामुहीक सहकार्य – प्रयत्नातून शंकरराव खरात यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू . असे उदगार खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी काढले .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षातल्या पुण्यस्मरण दिना निमित्त आयोजित कार्यकमात ते बोलत होते .
यावेळी खरात प्रतिष्ठानचे सचिव आणि शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणारे विलासराव खरात, शंकरराव खरात साहेबांचे सुपुत्र खरात प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष डॉ . रवी खरात, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, सांगलीच्या डॉ. मृण्मयी मिहीर बिरनाळे, आटपाडीच्या सरपंच सौ वृषालीताई पाटील, शिवसेनेचे नेते अॅड. धनंजयराव पाटील, भाजपाचे ज्येष्ट नेते बंडोपंतदादा देशमुख, विट्याचे ज्येष्ट साहित्यीक रघुराज मेटकरी, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्ह्याचे नेते अरुण वाघमारे, पंढरपुरच्या प्रा . सुरेखा भालेराव, प्रा . बी .एन . धांडोरे, गझलकार सुधीर इनामदार, अभिनेते विजय देवकर, संभाजीराव गायकवाड, शेती परिवार कल्याणचे प्रसादराव देशपांडे, रमेश जावीर, रमेश टकले, अरुण कांबळे बनपूरीकर, प्रा दिलीप सपाट, प्रकाश दौंडे, विजय मोटे,जीवन सावंत, विजय पवार, अरविंद चांडवले, रविंद्र लांडगे, भाजपा नेते स्नेहजीत पोतदार, वंचित बहुजनचे साहेबराव चंदनशिवे, प्रा . गौतम गायकवाड, अनिल लांडगे, डॉ. अमोल लांडगे, आनंद ऐवळे, माडगूळेचे सरपंच पांडुरंग गवळी, विजय देशमुख ,उत्तम बालटे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते
जन्मशताब्दी सांगता सोहळ्याच्या वेळी ११ जुलै ला राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या ज्योतिचे सर्वांसमवेत मोठे स्वागत करू . शाळा हायस्कुल कॉलेज च्या विद्यार्थ्यांना सहभागी करून साहित्यीक प्रज्ञावंताच्या उपस्थितीत या दोन दिवशीय उपक्रमात मोठा जागर करू . मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या सर्वांना समवेत घेऊन ग्रंथ दिंडी वगैरे साहित्यीक उपक्रमही मोठ्या दिमाखात साजरे त्यासाठी पडेल ती भूमिका घेणेस आणि सर्वतोपरी सहकार्य करणेस तयार आहे . असे ही राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले .
शंकरराव खरात साहेबांच्या स्मारक पूर्ती साठी लागेल ते सहकार्य करणेस आम्ही सदैव तत्पर असू . ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या नाट्यगृहासाठी निधी आणणे अशक्य असतानाही आमदार अनिलभाऊ बाबर यांनी विशेष प्रयत्नातून खास बाब म्हणून गदिमा नाट्यगृहास मंजुरी मिळविली . या १३ कोटी च्या आटपाडीतल्या गदिमा नाट्यगृहाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असे मत आटपाडीच्या सरपंच सौ वृषालीताई पाटील, त्यांचे सुविद्य पती अॅड. धनंजयराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले .
आपल्या जन्मभूमीतून ३१ डिसेंबर १९९९ रोजी च्या सरत्या वर्षाला आणि शतकाला निरोप द्यायचा आणि १ जानेवारी २००० रोजी नव्या वर्षाचे आणि शतकाचे स्वागत करायचे म्हणून आटपाडीत दोन दिवस पायी फिरून सर्व गावाला आणि महत्वाच्या स्थळांना भेटी देण्याचे काम शंकरराव खरात साहेबांनी केले . या दोन दिवसाच्या पायी दौर्‍यात मी (सादिक खाटीक ), कै शाहीर जयंत जाधव, गोमेवाडीचे प्रा नामदेव जावीर, खरात साहेबांचे स्नेही कै .मोटे मामा सहभागी झालो होतो . याचा वृतांत छापलेला पेपर वाचल्यानंतर खरातसाहेबांनी, छान लिहले आहे, तुमच्या लिखाणात साहित्यीक गुण आहेत, तुम्हीही मोठे साहित्यीक व्हाल असे आपणास पत्राद्वारे आशीर्वाद दिल्याचे सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात सांगीतले.
गदिमा, शंकरराव खरात, व्यंकटेशतात्या, ना . सं . इनामदार, औंधचे राजे बाळासाहेब उर्फ भवानराव पंतप्रतिनिधी, अरुण कांबळे, शांताबाई कांबळे, सत्यभामाबाई पंढरपूरकर, माजी आमदार जयंत सोहनी वगैरे मान्यवरांची आटपाडी तालुका जन्मभूमी आहे . यांच्या विचाराचा साहित्याचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा वारसा आम्ही त्यांच्या वैचारीक वारस – मुलांनी जोपासला आहे . साहित्यीकांच्या स्मारकासाठी अनेक वर्षापासून मी सतत आवाज उठवित आलो आहे हे सर्वश्रुत आहे . शेटफळे स्मारकाचा प्रश्न सोडविण्यात ना . जयंतराव पाटील यांच्या सहाय्याने यशस्वी झाल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
सर्व संस्था संघटना, पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येवून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, डॉ . रवि खरात, विलासराव खरात यांच्या समवेत पालकमंत्री ना. जयंतराव पाटील साहेबांची भेट घेऊन खरात साहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करू या . असे आवाहन करून सादिक खाटीक यांनी सर्वच क्षेत्रात नावलौकीक केलेल्या दिवंगत मान्यवरांचा गौरव जयंती पुण्यतिथी पुरता न करता सतत जागर करीत त्यांचे स्मरण केले पाहीजे . शाळा, हायस्कुल, कॉलेज मधून या माणदेशी मान्यवरांच्या कार्याची ओळख करून देणारे उपक्रम सतत राबविले पाहीजे . तरच नव्या पिढीला या महनीयांच्या उत्तुंग कार्याची ओळख होईल . असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
शंकरराव खरात प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ . रवि खरात यांनी, खरात साहेबांवरील आटपाडी तालुका वाशियांचे प्रेम पाहून मन भारावून गेल्याचे सांगीतले, सर्वांच्या समावेशाने जन्मशताब्दी सांगता समारोह करण्याचे आवाहन त्यांनी केले . तर प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांनी शासनाला सुचविलेल्या शासकीय जागेत शंकरराव खरात यांचे स्मारक व्हावे, यासाठी प्रदिर्घ लढा देत आल्याचे सांगीतले .
प्रा . सुरेखा भालेराव, प्रा .बी . एन . धांडोरे इत्यादीची खरात साहेबांच्या साहित्याचा जीवनाचा कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली .
विट्याचे साहित्यीक रघुराज मेटकरी यांनी शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडीत व्हावे असा ठराव विट्यातील ४० व्या साहित्य संमेलनात आम्ही घेतल्याचे सांगीतले .
नागपूरचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल विलासराव खरात यांचा विविध संस्था संघटना समाज आणि नेत्यांच्या वतीने सत्कार करणेत आला .
प्राचार्य विजय लोंढे सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर दीपक खरात सर यांनी आभार मानले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *