रासेयो शिबिरातून विद्यार्थी घडतो* -माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

■निमणी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
– आजचा युवक उद्याचा भाग्यविधाता आहे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी गोळा केल्याने विद्यार्थी घडतो असे प्रतिपादन माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी केले ते शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर व आय एस ओ ग्रामपंचायत निमणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा निमणी येथे २३ मार्च ते २९ मार्च आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स.शि.प्र.मं गडचांदूर अध्यक्ष डॉ आनंदराव अडबाले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह आय क्यू ए सी समन्वयक डॉ संजय गोरे प्रमुख अतिथी सरपंच सीमा जगताप उपसरपंच उमेश राजूरकर ग्रामसेवक शुभांगी ढवळे मुख्यध्यापक भालचंद्र कोंगरे शा व्य स अध्यक्ष प्रफुल काळे तमुस अध्यक्ष अशोक झाडे ग्रामपंचायत सदस्य मारोती कोडापे गिरजाबाई गोबाडे आदी उपस्थित होते
पुढे भोंगळे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपले आई वडील नातेवाईक व पुस्तकावर प्रेम केले पाहिजे तसेंच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे असे सांगितले
प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह यांनी सांगितले की महाविद्यालया तील राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घेतलेला विद्यार्थी समाजात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच शिबिरातून नेतृत्व करण्याचे गुण आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडते
अध्यक्षीय भाषणात डॉ आनंदराव अडबाले म्हणाले की विशेष शिबिराच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम होते नकळत होणारे संस्कार हे शिबिरातून मिळतात असे सांगितले
दिनांक २३ मार्च ते २९ मार्च या कालावधीत ग्रामसफाई पशुचिकित्सा शिबीर सायबर गुन्हे महिलांचे संरक्षण विषयक कायदे रक्तगट तपासणी व्यसनमुक्ती अभियान पर्यावरण मतदार जागृती महिलांचे हळदीकुंकू आदी कार्यक्रम होणार आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ संजयकुमार सिंह संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ शरद बेलोरकर तर आभार आय क्यू ए सी समन्वयक प्रा डॉ संजय गोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ सुनील बिडवाईक प्रा डॉ राजेश गायधनी प्रा डॉ माया मसराम प्रा डॉ सतेंद्र सिंह प्रा मंगेश करंबे शिपाई तानाजी बुऱ्हाण सुरेश चांदेकर यांनी प्रयत्न केले यावेळी प्रतिष्ठित नागरिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *