महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मुंबई येथे हुतात्म्यांना अभिवादन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २३/०३/२०२२ :-* मुंबई येथे पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघ मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहीद हुतात्म्यांना आदरांजली कार्यक्रम मुंबई येथील मंत्रालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी महाराज यांनी शहीद हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव यांना अभिवादन करून मानवंदना दिली.
यावेळी पुणे जिल्हा रविवाशी संवा संघाच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) व प्रमुख पाहुण्यांचे आदराजंली कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज यांच्यासह विठ्ठल कुऱ्हाडकर, राहुल गुजर व कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा रहिवाशी संघाचे पदाधिकारी व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.===========================
*फोटो मॅटर :- हुतात्मा भगतसिंग हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांना अभिवादन करतांना विष्णू कारमपुरी (महाराज) आणि विठ्ठल कुऱ्हाडकर दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *