मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा ३ रा वर्धापनदिन उत्साहात साजरा…                                             

 लोकदर्शन 👉 राहुल खरात

मिरज
दि. २४ मार्च २०२२

वंचित बहुजन आघाडीचा २४ मार्च रोजी ३ रा वर्धापन दिना निमित्त मिरज येथील रंगशारदा हॉल येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निस्वार्थपणे,निष्ठेने,तळमळीने पुर्ण वेळ पक्षाचे काम करीत असणारे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते किशोर आढाव,अनिल अंकलखोपे,प्रमोद मल्लाडे, परशुराम कांबळे, अनिल मोरे सर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे होते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सोमनाथ साळुंखे म्हणाले की आगामी सर्वच निवडणुका ताकदीने लढवून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कसोशीने तयारीला लागा. आगामी काळ हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणाले, ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा ४२ वर्षाचा प्रदीर्घ राजकीय अनुभवातून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन पुढील राजकीय वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. वडूज नगरपंचायत निवडणुकीचा किस्सा सांगून राजकीय डावपेच कसे आखले जातात त्याची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. बाळासाहेबांनी आखलेले अकोला पॅटर्न राबवून महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत आपण निर्णायक पक्ष ठरणार आहोत.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मोरे व आभार उमरफारूक ककमरी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा (दक्षिण) विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *