कोरपना तालुक्यात 10 वी शालांत परीक्षेला सुरुवात।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,7 मुख्य व 16 उपकेंद्रावरून 1123 विद्यार्थी देत आहेत परीक्षा
,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,(ता.प्र.)
,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10 वी च्या शालांत परीक्षा 15 मार्च पासून सुरू झाल्या आहेत.कोरपना तालुक्यात एकूण 7 मुख्य परीक्षा केंद्र व 16 उपकेंद्रावर एकूण 1123 विद्यार्थी परीक्षा देत आहेत,सर्वाधिक विद्यार्थी (463)स्थानिक महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर या मुख्य परीक्षा केंद्रावर आहेत. मुख्य परीक्षा केंद्रा मध्ये स्थानिक महात्मा गांधी विद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यालय चा समावेश आहे, याशिवाय कोरपना येथील वसंतराव नाईक विद्यालय व स्व,भाऊराव पाटील चटप आश्रम शाळे चा समावेश आहे,तसेच जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर,आदर्श किसान विद्यालय, नारंडा, व माध्यमिक आश्रम शाळा ,धानोली हे मुख्य परीक्षा केंद्र आहेत, अशी माहिती परिरक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सचिन मालवी व सहाय्यक परीरक्षक विकास भांडारवार यांनी दिली,
आज पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रावर मुख्याध्यापीका स्मिता चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच. बी.मस्की व इतर शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या,.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *