लोणी काळभोर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.माधुरीताई राजेंद्र काळभोर यांची बिनविरोध निवड

 

लोकदर्शन प्रतिनिधी 👉हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे

मागील सरपंच श्री.राजाराम विठ्ठल काळभोर यांनी आपला राजीनामा दिल्या मुळे ही निवडणूक घेण्यात आली.हवेली तालुका मंडल अधिकारी गौरी तेलंग यांच्या अध्यक्षते खाली ही निवडणूक पार पडली.

सरपंच पदासाठी माधुरी राजेंद्र काळभोर यांचा एकमेवच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली, असे गौरी तेलंग यांनी बोलताना सांगितले, माधुरी काळभोर यांची बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, यावेळी हवेलीचे जेष्ठ नेते श्री.माधव आण्णा काळभोर, मा.जि.प.सदस्य विलास आण्णा काळभोर, हवेली पंचायत समिती चे मा.उप सभापती सनी काळभोर, उपसरपंच संगीता ताई काळभोर, मा.सरपंच राजाराम बापू काळभोर, ग्रा.पं. सदस्य नागेश काळभोर व सर्व ग्रा.पं. सदस्य, व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *