रा. स्व. सं जनकल्याण समिती परळ भागाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न..!

लोकदर्शन 👉 महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार
९०८२२९३८६७

रा. स्व. सं जनकल्याण समिती परळ भागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम रविवार ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय लतादिदींना श्रदधांजली वाहून त्यांच्या निवडक गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. स्रीरोगतज्ञ डॅा. दिपाली काळे ह्यांनी कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून भूमिका बजावली. ह्या व्याख्यानातून त्यांनी उपस्थितांना महिलांच्या शारिरीक आणि मानसिक पैलुंवर मार्गदर्शन केले. जनकल्याण समिती परळ विभाग कार्यावह श्री. प्रताप शिवराम परब ह्यांनी आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व प्रेरणात्मक संबोधन केले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रणाली गवस व स्नेहा पारकर ह्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांची मेहनत उल्लेखनीय होती. हा कार्यक्रम परळ भाग अध्यक्ष श्रीमती नयना सावंत ह्यांच्या देखरेखीत उत्तमरित्या पार पडला.

महेश्वर भिकाजी तेटांबे
पत्रकार
९०८२२९३८६७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *