वंचित बहुजन आघाडी जिल्हापरिषद, पंचायत समिती संदर्भात महत्वाची बैठक संपन्न…

लोकदर्शन सांगली👉 राहुल खरात
दि. २ मार्च २०२२

महाराष्ट्रात येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज बुधवार दि. २ मार्च २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह, माधवनगर, सांगली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने रणनीतीवर चर्चा करण्यात आली. सांगली जिल्हा निरीक्षक संतोष सुर्यवंशी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे,उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, संजय कांबळे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे, गौतम लोटे, अनिल मोरे, विशाल धेंडे, मिलिंद कांबळे, सनी गायकवाड, अनिल कांबळे, सतिश शिकलगार, मधुकर कोलप, दत्ता आठवले, अमोल साबळे आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *