अवैध गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – पैनगंगा नदीतील वनोजा घाटातून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरना पकडले. ही कारवाई गुरुवार दिनांक ज२४ ला पहाटे चारच्या सुमारास करण्यात आली.
गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ ओ आर ६८५७ हे नदी घाटातून वाहतूक करीत असताना. गाडी चालकाला महसूल पथक मार्गावर असल्याचा सुगावा लागल्याने वेगाने पळून गेले. त्याचा पथकांनी पाठलाग करून झोटींग गावाजवळ पकडले. तर दुसरी कारवाई ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच ३४ एल ४२७६ च्या वाहन चालकाला महसूल विभागाच्या कारवाईचा सुगावा लागताच. ट्रॉली मध्ये भरून असलेली रेती एका शेताच्या मार्गावरच खाली करून पळ काढला. पथकाने त्याचा पाठलाग करून अंतरगाव जवळील श्री जगन्नाथ बाबा देवस्थान समोर पकडले. पंचनाम्याची करून कारवाईची माहिती तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना दिली. सदर कारवाई पथकात मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी वीरेंद्र मडावी, प्रभाकर कुडमेथे होते. कोतवाल रुपेश पानघाटे , तहसील कार्यालयाचे वाहन चालक नागोसे यांनी तहसील कार्यालयात वाहने लावण्यास मदत केली. महसूल विभागाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले गेले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *