*काल्पनिक मनुवादी  व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला छेद देणे काळाची गरज – मंत्री छगन भुजबळ*

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

⭕फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित हिरवे शिंदे यांचा ३१ वा सत्यशोधक विवाह हॉटेल ताज गेटवेत संपन्न.

*नाशिक*- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे शनिवार दि.5 फेब्रुवारी 2022 रोजी सायं. 6.30 वाजता महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिक चे पालकमंत्री ना. छगन भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उच्चशिक्षित सत्यशोधक प्रशांत पांडुरंग शिंदे ,(MTech,Comp),नगर  आणि सत्यशोधिका ऐश्वर्या शशिकांत हिरवे, (BE,Comp),नाशिक यांचा हॉटेल ताज-गेटवे , अंबड, नाशिक येथे संस्थेच्या वतीने ३१ वा मोफत सत्यशोधक विवाह सोहळा कोव्हिडं 19 च्या नियमाप्रमाणे समाजाला दिशा देत पार पडला.
*यावेळी राज्याचे व नाशिक चे पालकमंत्री नामदार भुजबळसाहेब म्हणाले की काल्पनिक मनुवादी  व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला पूर्णपणे छेद देणे काळाजी गरज असून या पुढे सत्यशोधक पद्धतीनेच विवाह सर्व समाजात लागले पाहिजेत.आमच्या घरात समीर भुजबळ यांनी ही प्रथा सुरु केली तो आदर्श हिरवे आणि शिंदे परिवाराने घेऊन आपल्या उच्चशिक्षित मुलांचा सत्यशोधक विवाह लावला त्याबद्दल दोन्ही कुटुबाचे अभिनंदन केले.पुढे भुजबळ साहेब म्हणाले की आता हे कार्य तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.तसेच हे व इतर कार्य कर्मकांडाला झुगारून ,आर्थिक उधळपट्टी न करीता कोरोनामुळे कमी लोकात ,गरजु सामाजिक संस्था ,मुले मुली यांना मदत करीत विवाह लावावेत असा मौलिक सल्ला दिला .तर सत्यशोधक रघुनाथ ढोक यांची टीम महाराष्ट्रभर व इतर राज्यात जावून प्रबोधन करीत मोफत विवाह लावतात त्याबद्दल त्यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले*.
.या वेळी सुरुवातीला वधु वर यांचे हातात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय घेऊन सभागृहात आगमन झाले त्यानंतर त्यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास तर सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वधु वर यांचे आई वडील यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तर वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि फुले दांपत्याची फोटोफ्रेम पालकमंत्री भुजबळसाहेब यांचे हस्ते देण्यात आली. तसेच त्यांच्या आईवडील व मामामामीनां आणि विशेष सहकार्य केले म्हणून गिरीष बच्छाव, योगेश कमोद यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जेष्ठ समाजसेवक उत्तम तांबे,काँग्रेस ओबीसी चे विजय राऊत यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
या सत्यशोधक विवाहाचे कार्य प्रबोधन पर माहिती देत विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे  महात्मा फुले यांचे वेशभुषेत पार पाडले तर महात्मा फुले रचित मंगळाष्ट्काचे गायन व उद्देशिका चे वाचन प्रा.सुदाम धाडगे आणि हनुमंत टिळेकर यांनी केले.या विवाह सोहळ्याचे आयोजन व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते शिशिकांत हिरवे यांनी मानले तर मोलाचे सहकार्य वेध न्युज चॅनेलचे योगेश कमोद व आकाश ढोक यांचे लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *