जखमी सुनिता शिंदेला उपचारासाठी २५००० रु.ची आर्थिक मदत

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕नांदा शिवस्मारक समितीचा पुढाकार

औद्यागिक नगरी नांदाफाटा येथील बाजारपेठेत शेतकरी बाधंवाकडून दररोज ताजा भाजीपाल्याची छोटी गुजरी भरविली जाते याच गुजरीत सुनिता शिंदे ही महिला भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करते १ फेब्रुवारीला ती पहाटे आपला चारचाकी ठेला घेऊन जात असतांना गडचांदूर कडून भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकल स्वाराने तिला मागून जोरदार धडक दिली यात महिलेला गंभीर दुखापत झाली तिच्या पायाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला महीलेला मदत करण्याऐवजी मोटारसायकल स्वाराने तिथून पळ काढला पोलीसांनी महिलेला उपचारासाठी चंद्रपूरला हलविले सुनिता शिंदे हिची परीस्थिती हलाखीची पती नाही शेती नाही भाजीपाला विकून दोन पैसे कमविणे हेच एकमेव साधन सुनिता शिंदेला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले रक्तस्राव झाल्याने रक्त चढवून ४ तारखेला तिचे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिची प्रकृती आता स्थिर आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील स्थायी कर्मचारी पांडुरंग खिरटकर यांचेवर याप्रकरणी गडचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरु आहे पायाला जबर दुखापत झाल्याने किमान वर्षभर तिला उपचार घ्यावा लागेल सुनिता शिंदे हिचेवर अचानक संकट कोसळले सुनिता शिंदेला मदतीचा हात देण्याकरीता नांदा शहर शिव स्मारक समितीने पुढाकार घेतला तिचे उपचारासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली पुढेही मदत केली जातील सुनिता शिंदेला अपघात विमा मिळवून देण्यासाठी नांदा शहर शिव स्मारक समिती आवश्यक ती सर्व मदत करणार आहे

त्याने काढली पळ युवक धावले मदतीला

भरधाव वेग निष्काळजीने गाडी चालवुन अपघात केला महिलेला जबर मार लागला मदतीसाठी आवाज केला त्याने मदत करण्याचे सोडून पळ काढला स्थानिक राजकिय पदाधिकार्‍यांचे आश्वासनच राहले अखेर नांदा येथील युवकांनी पुढाकार घेतला नांदा शहर शिव स्मारक समितीने १५ हजार व पंढरीनाथ गेडाम ग्रा.वि.अ. यांनी १० हजार रुपये रोख रक्कम देऊन उपचार व खर्चा करीता मदतीचा हात दिला

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *