45 हजार प्राथमिक शिक्षकावरील अन्याय दूर करा,, ,,,,पालकमंत्री कडे केली मागणी।. 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
दिनांक- २५ डिसेंबर २०२१ रोजी प्राथमिक शिक्षकांना संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी नसल्याने नियमित सेवेच्या बारा वर्षानंतर महाराष्ट्र शासनातर्फे प्रोत्साहन स्वरुपात दिल्या जाणाऱ्या वरीष्ठ वेतनश्रेणी यात सातव्या वेतन आयोगात गंभीर स्वरुपाच्या वेतनत्रुटीमुळे महाराष्ट्रातील ०१ जानेवारी २००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या जवळपास पंचेचाळीस हजार प्राथमिक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. अगोदरच नोव्हेंबर २००५ नंतर जूनी पेंशन याजना बंद करण्यात आली आहे आणि आता सातव्या वेतन आयोगात पुन्हा अन्याय झाला आहे. म्हणून सातवा वेतन आयोग वेत्रुटी कृती समितीच्या वतीने शिष्टमंडळासह *चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब (मंत्री- खार व जमिन विकास आणि भूकंप पूनर्वसन तसेच इ.मागास,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, वि.जाती, भ.जमाती, आणि विशेष मा.प्रवर्ग कल्याण, महाराष्ट्र.)* यांना नगर परिषद राजूरा यांच्या वतीने आयोजित *छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमा* प्रसंगी शासकीय विश्राम गृह राजुरा येथे आपल्या राजुरा विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार सुभाषभाऊ धोटे आणि राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष माननीय अरुणभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन संबंधित मुद्दा मांडत चर्चा केली. महाराष्ट्र भरातून हे अन्यायकारक बाब समजून घेत महाराष्ट्रातील हजारो प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्याबाबत निवेदनसह विनंती करण्यात आली.अशी माहिती

श्री. मुबारक पटेल
राज्य सदस्य तथा शिष्टमंडळ वेतन त्रुटी कृति समिती चंद्रपूर यांनी दिली
,,फोटो,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here