कोरपना येथे स्व, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी                                                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना,,,
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुकाच्या वतीने स्व श्रद्धेय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थिती मध्ये श्री अरुण मडावी सरपंच, श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक,श्री ओम पवार जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष,श्री अनिल खडसे युवा मोर्चा पदाधिकारी,श्री पद्माकर दगडी भाजप पदाधिकारी,श्री येडे,श्री संदीप टोंगे,आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वालीयर येथे झाला, आपल्या जीवनात अविवाहित राहून भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करत असताना अनेक जन उपयोगी कामे केली भारताचे प्रधानमंत्री पद तीन वेळा भूषविले, मोठ मोठे निर्णय घेतले ,अनुशक्ती पोखरण परीक्षण, भारतातुन पाकिस्तानला बससेवा सुरू करून स्वतः बसने पाकिस्तानला गेले, कारगील युद्ध जिंकले, त्यांनी 50 वर्षे देशाची सेवा केल्या बद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांनी निस्वार्थ दैशाची सेवा केली असे मनोगत व्यक्त केले , इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ओम पवार यांनी केले तर आभार दिनेश खडसे यांनी मानले,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here