महामार्गावरील नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे,, चौकशी करा,,, ,,नगरसेवक विक्रम येरणे यांची मागणी।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
भोयगाव, गडचांदूर, वणी महामार्ग चे काम गेल्या काही महिन्यांपासून अतिशय संथपणे सुरु आहे,
राजीव गांधी चौक ते माणिकगड कंपनी पावेतो च्या महामार्गाच्या बाजूने सिमेंटच्या नाली चे बांधकाम सुरू आहे, या बांधकाम मध्ये स्लॅब ची जाडी 3 ते 3,5 इंच ठेवली जात आहेत तसेच स्टील राड सुद्धा कमी प्रमाणात वापरले जात असल्याने बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहेत, तेंव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नगर सेवक तथा गटनेते विक्रम येरणे यांनी कार्यकारी अभियंता ,सार्वजनिक बांधकाम विभाग क्र,2 यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात केली आहे,
सदर महामार्गावर आजपर्यंत अनेक ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी झाली आहेत, तेव्हा या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here