महात्मा गांधी विद्यालय सोनूर्ली येथे संविधान दिन साजरा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे २६ नोव्हेंबर ला प्राचार्य शरद जोगी यांच्या अध्यक्षतेखाली निबंधब स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला.सर्व प्रथम डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.प्राचार्य शरद जोगी यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला शिक्षक दत्ता येडमे,पद्माकर खैरे,रामकृष्ण परसूटकर, सलमाबी कूरेशी,प्रा.साईनाथ कुंभारे, प्रा.विनोद पत्रेकार वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पद्माकर खैरे सर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *