त्या मदतीने दिली तिला जगण्याची जिद्द

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – कॅन्सर नावाचा शब्दही ऐकला, तरी जीवन-मरणाचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अशा परिस्थितीत केवळ मानसिक व उपचारासाठी आर्थिक पाठबळच त्यासाठी आधार ठरते. हाच आधार व मदत या आजाराला झुंज देणाऱ्या वृंदाला
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी कल्याण निधीतून प्राप्त झाला आणि तिला जगण्यासाठी नव बळ प्राप्त झाले.
कोरपना तालुक्यातील पिपरी येथील शेतकरी
दिलीप पिंपळशेंडे यांच्या पत्नी वृंदा दिलीप पिंपळशेंडे यांना काही दिवसापूर्वी स्तनाचा कॅन्सर असल्याची बाब कळाली. यावर डॉक्टरानी शस्त्रक्रियेचा उपचार सुचविला. मात्र घरची परिस्थितीही सर्वसामान्य असल्याने उपचारासाठी इतका पैसा आणायचा कुठून हा प्रश्न कुटुंबात उपस्थित झाला. ही बाब जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांना शेतकरी दिलीप पिंपळशेंडे यांनी सांगितली. त्यांनी लागलीच यावर पाठपुरावा करून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून रोख तीस हजार रुपयाची आर्थिक मदत प्राप्त करून दिली. या अनुषंगाने मदतीचा धनादेश
बुधवार दिनांक २४ ला
जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. यावेळी कोरपना नगरपंचायत चे माजी उपाध्यक्ष मनोहर चने, , इस्माईल शेख, निसार शेख, अनिल गोंडे , सचिन चने अमोल खाळे विलास कोटरगे बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या शेतकरी कल्याण निधी या योजनेतून अनेक गरजूना त्यांच्या संकट काळात मोठा आधार मिळाला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *