

By 👉Mayur Ekare
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे प्रथम
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबरला शाळे च्या सभागृहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रदिप वांढरे जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे होते. सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथिनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तसेच जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रशांत खैरे यांनी तर ज्योति चटप यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.