राष्ट्रीय टी- 20 चैंपियनशिप साठी निवड झालेल्या खेळाडुंचे यश अभिमानस्पद : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर

⭕*गोवा येथे राष्ट्रीय टी-20 चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके, रॉबिन नळे, मनोज मंगम यांची निवड*

*⭕निकिता ढोरकेच्या यशाने जिल्ह्याची मान अभिमानाने ऊंच*

नेपाळ येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिप स्पर्ध्येत प्रथम क्रमांक पटकावून देशाचे नाव उंचविणाऱ्या चंद्रपूर येथील निखिता ढोरके तसेच गोवा येथे होणाऱ्या टी-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके यांचे सोबत रॉबिन नळे, मनोज मंगम यांचे अभिनंदन करून भारतीय जनता पार्टी तर्फे आर्थिक मदत विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

उपजत कलागुणांना संधी मिळाली की आकाशाला गवसणी घालता येते याची प्रचिती दुर्गापूर येथील निखिता ढोरके या खेळाडूने दाखवून दिले आहे. नुकत्याच 7 ते 11 ऑक्टोबर 2021 ला नेपाळ येथील पोखरा शहरात भरलेल्या इंटरनॅशनल टी-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताला प्रथम क्रमांक पटकावून चंद्रपुर जिल्ह्याची मान अभिमानाने ऊंच केली आहे , आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

तसेच गोवा येथे 20 ते 22 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या नॅशनल टी-20 टेनिस बॉल चॅम्पियनशिपसाठी निखिता ढोरके यांचे सोबत रॉबिन नळे व मनोज मंगम या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंचे अभिनंदन करून आर्थिक मदत देखील आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

त्यांच्या भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा देत या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान व भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम यांनी केले.

मिशन शौर्यच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी यापूर्वी एव्हरेस्ट सर करून चंद्रपुरची विजयी पताका एव्हरेस्टवर फडकविली आहे. होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत नेहमीच आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडून केली जाते , होतकरुंच्या पाठीशी उभे राहणारे आ. सुधीर मुनगंटीवार आमचे नेते आहे , याचा आम्हाला अभिमान असल्याचे असे रोशनी खान यावेळी म्हणाल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *