महाविकास आघाडीच्या बंदच्या हाकेला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

By : Mohan Bharti

राजुरा :– केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेल्या तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आणि देशात शेतकऱ्यांचे कित्येक महिन्यांपासून शांततामय मार्गाने आंदोलन सुरू आहे. या आंदोलना अंतर्गत लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलन करीत असताना उत्तर प्रदेश सरकारच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या गाडी च्या ताफ्याने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीने चिरडून ८ निष्पाप शेतकऱ्यांच्या हत्या केल्या. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. यानिमित्ताने राजुरा येथे महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्तपणे शहरात बाईक रॅली काढून व्यापारी व नागरिकांना बंदचे आवाहन केले. याला राजुरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला तालुकाध्यक्षा कविता उपरे, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, जि प सदस्य मेघाताई नलगे, अविनाश जेणेकर, नगरसेवक हरजीत सिंग संधू, गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहणे, दिपा करमनकर, साधना भाके, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, संगीता मोहुर्ले, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, राष्ट्रवादीचे राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मेहमूद मुसा, शहर अध्यक्ष रकिब शेख, युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, उमेश गोरे, विनोद झाडे, मारोती बोढेकर, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, शाहनवाज कुरेशी, सुजित कावळे, रजुभाऊ दादगाळ, जाहीर खान, संदीप पोगला, शिवा सोळंकी, अंकुश भोंगळे, विजय कुमरे, प्रसाद देशमुख, स्वप्नील बाजुजवार, एकनाथ कोरासे, मंगेश वाघमारे, राहुल वनकर यासह कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चे विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *