रानगवे राजकारण

राजकारणातील रानगवे आता लपून राहिले नाहीत ..त्यांच्या व्यक्तिगत लोकप्रियतेचे जेंव्हा तीन तेरा वाजतात तेंव्हा ते लोकप्रिय हिरवाकंच चारा शोधतात .तो चारा तोंडाशी लावत ते एकमेकांसोबत टक्कर घेत हिरवेकंच शेतही तुडवितात ..सांडो के लढाईमें खेत का सर्वनाश अशी एक म्हणच आहे ….सोनू सूद नावाचा हिरवाकंच चारा आपल्या तोंडाशी लागावा जेणे करून त्याने कोरोनात गोरगरीब मजुरांसाठी केलेल्या कामाचे पुण्य त्याच्या पदरात पडण्यापेक्षा आपल्या पदरात पडेल अन आपल्या कारनाम्यामुळे लोकप्रियतेत हलकी झालेली आपल्या पक्षाची झोळी त्याच्या लोकप्रियतेनें भरून निघेल या साठी राजकारणी रानगवे सरसावले ..यात भाजपा ,शिवसेनेने आघाडी घेतली ..काँग्रेस आपली गरीब गाय.. ते मात्र सोनू पेक्षा सोनियाजीच्या भरवशावर ..,राहली राष्ट्रवादी तर ते शरद पवार यांना जगातील सर्वात मोठा नेता समजत कुण्या अभिनेत्याच्या पाठीमागे धावतच नाहीत ..भाजपने कोरोनात सोनू सुदच्या कामाचे बेंबीच्या देठापासून कौतुक करून त्याला आपल्या नादी लावण्याचे भरकस प्रयत्न केलेत ..त्याला दोनदा राज्यसभेत पाठवीत असल्याचे सांगितले ..पण सोनुने सक्रिय राजकारणाला नाकारताच भाजपने सोनू सूद मामला थंडया बसत्यात टाकला ..शिवसेनेने त्याला जय महाराष्ट्र म्हणा साठी प्रयत्न केलेत ..यश दिसत नसल्यामुळे संजय राऊत साहेबांनी त्याच्या विरोधात स्वतःला महात्मा समजतो काय बे असे स्पष्ट करीत सामना रंगवला ..जेंव्हा सोनू उद्धव याना भेटला तेंव्हा संजय राऊत यांच्या पेनातील शाई संपली ..दरम्यान सोनू सुदने  आपचे नेते व दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सोबत एक प्रेस काँफेरन्स केली ..केजरी सरकारच्या सामाजिक कार्याचा ब्रँड होण्याचे त्याने मान्य करताच त्याला जिभेने चाटनाऱ्या भाजपने शिंगावर घेण्याचे ठरविले ..,इन्कमटॅक्स सक्रिय झाले ..त्याच्या घरदारावर धाडी घातल्या ..एवढे सापडले ,तेवढे सापडले तोंडात येईल ते सापडले जाहीर करून त्याला बदनाम केले ..भाजपच्या या गोबेल्स नितीवर सोनू काहीच बोलला नाही ..तुका म्हणे उगे रहा ही भूमिका त्याने घेतली ..आता मात्र तो बोलला ..म्हणाला प्रत्येक वेळी आपली न्यायाची बाजू मांडण्याची गरज नसते ..वेळ येताच मी सर्वच सांगेल ..मी देशाची व गोरगरिबांच्या सेवेत कुठेच खंड पडू देणार नाही असे तो म्हणाला ..,कोरोना काळातील मदतीने सोनू गरिबांचा मासिहा बनला ..लोकांच्या आपल्या प्रातांत जाण्याची व्यवस्था ,रुग्णांना रेमेडिसीवर पुरविणे अनेक उपक्रम त्याच्या संस्थेने राबविलेत ..पंजाबच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत ..सोनू तिकडचा असल्यामुळे त्याचा नंदीबैल करून त्याला भाजपला फिरवायचे आहे ..पण अडल्या नडल्याच्या महादेवाच्या या नंदीने त्यांच्या सोबत फिरण्यास नकार दिला ..तो आता आप सोबत फिरेल या भीतीने त्याला दाबण्याचा भाजपने अयशस्वी प्रयत्न केला ..त्याच्या घरादारावर इन्कम टॅक्स धाडी हा यातील एक भाग समजण्यास हरकत नाही .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *