आ. सुधीर मुनगंटीवर यांच्‍या आमदार निधीतुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात ६१ लक्ष ०६ हजार रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी

By : Shivaji Selokar

सन २०२१-२२ या वर्षात स्‍थानिक विकास कार्यक्रमांतर्गत लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या आमदार निधीतुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात ६१ लक्ष ०६ हजार रू. किंमतीच्‍या विकासकामांना प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आलेली आहे.

या मंजूर विकासकामांमध्‍ये पोंभुर्णा तालुक्‍यातील देवई येथे २ नग हायमास्‍ट लाईटसाठी ८ लक्ष ९३ हजार रू. तसेच देवई ते घनोटी तुकूमकडे जाणा-या पांदन रस्‍त्‍याचे खडीकरणासाठी रू. ७ लक्ष, केमारा  येथे २ नग हायमास्‍ट लाईटसाठी ८ लक्ष ९३ हजार रू. तसेच केमारा येथे श्री. किशोर पोरते ते श्री. कालीदास वेलादी यांच्‍या घरापर्यंत रू. ५ नालीचे बांधकाम रू. ५ लक्ष, चिंतलधाबा येथे श्री शिवराम मडावी यांच्‍या घरापासून श्री. उध्‍दव कोसरे यांच्‍या घरापर्यंत बंदिस्‍त नालीचे बांधकामासाठी रू. ५ लक्ष तसेच चिंतलधाबा येथे श्री. चरणदास उईके ते श्रीमती शोभाताई पोरेते यांच्‍या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट नालीचे बांधकामासाठी रू. १० लक्ष, बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावात वार्ड क्र. ५ येथील श्री. बुटानी खोब्रागडे यांच्‍या घरापासून श्री. श्रीरंग देवाळकर यांच्‍या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम रू. ७.०० लक्ष, भिवकुंड (विसापूर) येथील रस्‍त्‍याचे खडीकरणासाठी ७.०० लक्ष, मुल तालुक्‍यातील डोगरगांव येथील वार्ड नं. 1 येथे श्री. केशव चौधरी यांचे घराजवळ एक बोअरवेल तसेच मारोडा येथील भिवसन मोहल्‍लयात श्री. श्रीहरी जुनारकर यांचे घराजवळ बोअरवेल या विकासकामांचा समावेश आहे. सदर रस्‍त्‍यांची व बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 चंद्रपूरच्‍या माध्‍यमातुन लवकरच सुरू होतील.

हे कामे मंजूर केल्‍याबद्दल जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष तसेच जिल्‍हा परिषद सदस्‍य देवराव भोंगळे, जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य वैशाली बुध्‍दलवार, अॅड. हरीश गेडाम, पृथ्‍वीराज अवताडे, भाजपा तालुकाध्‍यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, उपसभापती ज्‍योती बुरांडे, भाजपा महिला आघाडीच्‍या अध्‍यक्षा तसेच पंचायत समिती सभापती अलका आत्राम, पंचायत समिती सभापती सौ. इंदिरा पिपरे, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, पंचायत समिती सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, उपसभापती सोमेश्‍वर पदमगिरीवार, पंचायत समिती सदस्‍य सौ. विद्या गेडाम, गोविंदा पोडे, उपसभापती जयश्री वलकेवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन व जनतेच्‍या वतीने आभार व्‍यक्‍त केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *